विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घेतला सहभाग
सिल्लोड, (प्रतिनिधी): इंद्रराज कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाकडून थोर भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांच्या जीवनकार्यावर आधारित पोस्टर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
भारताचा गौरव विज्ञान आणि राष्ट्रप्रेम यांचा संगममफ तसेच वनस्पतींचे जीवन डॉ. बोस यांचा क्रांतिकारक शोध या दोन विषयांवर बीएस्सी. शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात विभागाकडून घेण्यात आली. या पोस्टर स्पर्धेत विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने
सहभाग नोंदवला असून विद्यार्थ्यांनी डॉ. बोस यांच्या वैज्ञानिक योगदानासह त्यांच्या राष्ट्रप्रेमी विचारांचे प्रभावी सादरीकरण पोस्टरच्या माध्यमातून केले.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे विभागप्रमुख प्रोफेसर जालिंदर अंभोरे यांनी यावेळी नमूद केले. स्पर्धेच्या निकालात प्रवीण काकडे याने प्रथम क्रमांक, साक्षी दाभाडे हिने द्वितीय क्रमांक तर पुष्पांजली वेलदोडे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. जी. राजपूत यांनी विशेष बक्षीस जाहीर
करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. जालिंदर अंभोरे, डॉ. रुपाली बिरादार आणि प्रा. अजमात सय्यद यांचे यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी अभिनंदन केले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत प्राचार्य प्रोफेसर राजपूत यांनी व्यक्त केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे डॉ. रुपाली बिरादार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.












